Friday, March 30, 2012

आयपीएलचे अर्थशास्त्र कैलाश राजवाडकर

आयपीएलचे अर्थशास्त्र
कैलाश राजवाडकर

आयपीएलचे अर्थशास्त्र
कैलाश राजवाडकर

लोकसंख्येची प्रचंड टक्केवारी एका विशिष्ट वाहिनीवर एकत्र आणण्याची गरज निर्माण झाली आणि त्यासाठीच आयपीएलचा जन्म झाला. क्रिकेटचे वेड असलेल्या या देशात- खेळ या एकमेव गोष्टीत एवढे सामथ्र्य आहे की, जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण राष्ट्र बांधून ठेवू शकते. आणि आयपीएलच्या यशाने हे नि:संशयरीत्या स्पष्ट केलेले आहे.


क्रयशक्तीतील तुलनेचाच विचार करायचा तर भारतात जाहिरातींवर केला जाणारा खर्च अमेरिकेपेक्षा सात पटीने अधिक आहे, असे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाच्या क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या (एफएमसीजी) बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षांनी म्हटले होते..
पिच मॅडिसनच्या २०१२च्या अहवालानुसार, भारतातील १४.६ कोटी घरांमधून असलेल्या दूरदर्शन संचाद्वारे ६२३ वाहिन्यांचा पर्याय उपलब्ध असलेली १२५ कोटी लोकसंख्या यांचा विचार करता ही तुलना अगदीच काही वावगी नाही.
हाच धागा पकडून बोलायचे तर, लोकसंख्येची प्रचंड टक्केवारी एका विशिष्ट वाहिनीवर एकत्र आणण्याची गरज निर्माण झाली आणि त्यासाठीच आयपीएलचा जन्म झाला. क्रिकेटचे वेड असलेल्या या देशात- खेळ या एकमेव गोष्टीत एवढे सामथ्र्य आहे की, जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण राष्ट्र बांधून ठेवू शकते. आणि आयपीएलच्या यशाने हे नि:संशयरीत्या स्पष्ट केलेले आहे. आयपीएलच्या मोसमात तर सासू-सुनांच्या मालिकांचा टीआरपीदेखील खाली आल्याचे स्पष्ट झाले.
आयपीएलचे महसुली उत्पन्न म्हणजे सोनीला दूरदर्शनवरून सामने प्रसारित करण्यासाठी दिलेल्या हक्कांपासून मिळणारा महसूल, जो प्रारंभिकरीत्या पहिल्या तीन वर्षांमध्ये बीसीसीआयला २०% व संघांना ८०% असा होता आणि त्यामध्ये ६ ते १०व्या वर्षांपर्यंत ४०% बीसीसीआयला व संघांना ६०% असा बदल झाला.
पीआयएनसी - या स्टॉक ब्रोकरेज संशोधन चमूच्या अहवालानुसार २०११ मध्ये आयपीएल ४ मध्ये ७४ सामन्यांसाठी दूरदर्शनवरील प्रत्येक १० सेकंदांसाठीच्या जाहिरातींकरिता सुमारे १५,७१४ स्लॉटस् अपेक्षित होते आणि जाहिरातीचा स्पॉट दर प्रत्येक १० सेकंदांसाठी ५ लाख ५० हजार एवढा होता, जो ७ लाखापर्यंत पोहोचला होता. २००८ मध्ये, आयपीएलची सुरुवात झाल्याच्या पहिल्या मोसमादरम्यान जाहिरातींचे दर प्रत्येक १० सेकंदांसाठी २ लाख होते.
सर्वाधिक टीआरपीला मागे सारून आयपीएलने मिळवलेले यश जाहिरातींच्या वाढत्या दरावरून नक्कीच मोजता येऊ शकते. इंडिया इन्फोलाइन या स्टॉक ब्रोकरेज संस्थेच्या आणखी एका अहवालानुसार, २००८ मध्ये आयपीएलची प्रेक्षकसंख्या सर्व वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा खूपच अधिक होती. 
आयपीएलच्या सामन्यांना त्यानंतर ८.२ एवढा सरासरी टीआरपी होता, जो नंतर ५ पर्यंत खाली आला, परंतु तरीही 'क्यूँ की सास भी कमी बहू थी' यासारख्या मालिका सुरू असलेल्या सर्व वाहिन्यांपेक्षा तो अधिक होता, असे इंडिया इन्फोलाइनचा अहवाल सांगतो.
सोनीच्या प्राइम टाइमचा २००८ मधील समभाग २९% पर्यंत वाढला होता, जो िहदी मनोरंजन वाहिन्यांच्या सर्वोच्च नऊ वाहिन्यांच्या एकत्रित बाजारपेठ समभागांपेक्षाही अधिक होता. सासू-सुनेच्या मालिकांपासून फारकत घेत बहुसंख्य महिला प्रेक्षकदेखील आयपीएलकडे वळल्या होत्या, ज्यामुळे जाहिरातदारांच्या आनंदात अधिक भर पडली.
र्सवकषरीत्या बोलायचे झाले, तर आयपीएलचा जाहिरातीद्वारे मिळालेला रु. ७०० कोटींचा महसूल हा भारतातील एकूण वाहिन्यांच्या जाहिरातींच्या ७% होता.
आयपीएलच्या जाहिरातींमागील यश
१. कमी कालावधी : टी२० सामन्यांचा ३ तासांचा कालावधी भारतातील नोकरदार माणसांसाठी योग्य होता. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी त्यांना संपूर्ण दिवस घालवावा लागत नव्हता. 
२. प्राइम टाइम : हे सामने शनिवार-रविवारी सायंकाळच्या वेळेत तर इतर दिवशी प्राइम टाइममध्ये (रा. ८ ते ११ वा. या वेळेत) खेळवले जात. ही वेळ भारतात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळवण्यासाठी योग्य होती आणि नोकरदार वर्गही हे सामने पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये जाऊ शकत होता.
फिक्की -फ्रेम्सच्या २०१२च्या अहवालानुसार, क्रिकेटमुळे जाहिरातींचा ओघ ८०% हून वाढल्याने, प्रसारणकर्त्यांनी इतर खेळांच्या शौकिनांकडेही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी टेन अ‍ॅक्शन प्लस ही २४ तास फुटबॉल वाहिनी सुरू झाल्यानंतर टेन स्पोर्टस्ने केवळ गोल्फसाठी वाहिलेली वाहिनी सुरू करण्याचे ठरवले आहे. टेन गोल्फ पुढील महिन्यात सुरू होत आहे. फुटबॉल आणि गोल्फ या खेळांसाठीचे हक्क संपादन मूल्य केवळ १०%, म्हणजे क्रिकेटच्या थेट प्रसारणाच्या हक्कांपेक्षा फारच कमी असल्याने या खेळांमुळे पैसे असलेल्या वर्गातील खरेदीदारांकडे लक्ष केंद्रित करणे जाहिरातदारांना शक्य होईल, असे एफआयसीसीआय-फ्रेम्सचा अहवाल सांगतो.
२०११ मध्ये क्रिकेट विश्वचषकापाठोपाठ सुरू झालेल्या आयपीएलने फेब्रुवारी ते मे हा चार महिन्यांचा कालावधी नव्या िहदी चित्रपटांच्या प्रदर्शनासहित मनोरंजन वाहिन्यांसाठी अक्षरश: झाकोळून टाकला.
जाहिरातींवर दृष्टिक्षेप
पिच मॅडिसनच्या जाहिरातींवरील दृष्टिक्षेपानुसार २०११ मधील सर्व भारतीय प्रसारमाध्यमांतील- वृत्तपत्रीय, इलेक्ट्रॉनिक आणि आऊटडोअर- जाहिरातींचे प्रमाण ८ टक्क्य़ांनी वाढून रु. २५ हजार ५९४ कोटींपर्यंत पोहोचले आणि २०१२ मध्ये ते ९ टक्क्य़ांनी वाढून रु.२८ हजार १३ कोटींपर्यंत पोहोचले. 
आयपीएल जाहिरातींसाठी रु. १००० कोटी खर्च होतात, ते एकूण जाहिरात धडाक्याच्या केवळ ४% च्या आसपास आहेत, तरीही त्यामध्ये याबद्दलचे स्वारस्य निर्माण करण्याची आणि वाढवण्याची क्षमता नक्कीच असते.
आयपीएलची संरचना
संघ स्वत:च्या मालकीचा करून घेण्यासाठी फ्रँचायझींनी बोली लावली होती. आठ संघ खरेदी करण्यासाठी आधारभूत मूल्य किंवा आरक्षित मूल्य ४०० दशलक्ष डॉलर्स असताना २००८ मध्ये झालेल्या लिलावात क्रिकेट मंडळाने तब्बल ७२३.६ दशलक्ष डॉलर्स मिळवले होते.
संघांच्या मालकीकरिता फ्रँचायझींकडून जमा झालेल्या रकमांव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मुख्य प्रायोजकत्वासहित वाहिन्यांकडून प्रसारणाचे शुल्क मिळते.
मुख्य प्रायोजकत्वाचा भाग म्हणून रु. ९० कोटींसाठी हीरो होंडा, किंगफिशर एअरलाइन्स, व्होडाफोन, सिटी बँक आणि पेप्सी या इतर पाच सहकारी प्रायोजकांसह रु. ४० कोटींकरिता शीर्षक प्रायोजक म्हणून डीएलएफने सहकार्य करार केला आहे.
२००८ मध्ये सुरू झाल्यानंतर पुढील ५-१० वर्षांसाठी र्सवकषरीत्या आयपीएल बीसीसीआयला १.६ दशलक्ष डॉलर्स (रु. ८,००० कोटी)चे उत्पन्न मिळवून देईल, ज्यापकी ४०% आयपीएलकडेच राहतील, तर ५४% फ्रँचायझीला, तर ६% पारितोषिकांची रक्कम म्हणून ठेवली जाईल.
त्यानंतर या संघमालकांपकी प्रत्येक जण संघ प्रायोजकत्व, प्रवेशिका / मदानावरील तिकीटविक्री, मदानावरील जाहिराती, व्यापार इ.द्वारे त्यांनी गुंतवलेले पसे वसूल करू शकतो. त्यांच्या खर्चामध्ये खेळाडूंचे वेतन, मदानाचे शुल्क आणि संघाची जाहिरात यांचा समावेश असतो.
अखेरीस, आयपीएल वाहिन्यांवरील जाहिरातींद्वारे रु. ७०० कोटींसह वार्षकि रु. १,२०० कोटी, शीर्षक प्रायोजक व सहयोगी प्रायोजकांद्वारे रु. १३० कोटी, संघ प्रायोजकांद्वारे रु. १६० कोटी, तिकीटविक्रीद्वारे रु. १७० कोटी, मदानावरील जाहिराती व व्यापाराद्वारे रु. ८० कोटींचे उत्पन्न मिळवेल.
इंडिया सिमेंटस्च्या मालकीच्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या आयपीएलमधील गुंतवणुकीचे कशा प्रकारे समर्थन केले, हे जाणून घेणे खरोखरच मनोरंजक आहे. २००८ मध्ये गुंतवणूकदारांशी चर्चा करताना, कंपनीचे उपाध्यक्ष व सीईओ एन. श्रीनिवासन यांनी आयपीएलमधील गुंतवणुकीमागील त्यांचा दृष्टिकोन सविस्तररीत्या स्पष्ट केला.
''माझे प्रमुख प्रतिस्पर्धी ग्रासिम तसेच एसीसी म्हणजे अंबुजा यांनी गेली दोन-तीन वष्रे किंवा त्याहून अधिक वष्रे त्यांच्या बॅ्रण्डचा प्रचार करण्यासाठी क्रिकेटचा माध्यम म्हणून फारच परिणामकारक पद्धतीने वापर केला आहे. तुम्हाला एवढेच करायचे आहे, अ‍ॅडलेडसारख्या सर्वागसुंदर ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत सामन्याकडे लक्ष ठेवा, संपूर्ण सीमारेषा अल्ट्राटेक सिमेंटची असेल. जर यापूर्वी झालेला पाकिस्तान तसेच ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा तुम्ही आठवून पाहिलात, तर ज्या ज्या मदानावर सामना खेळला गेला, त्या प्रत्येक मदानावर अल्ट्राटेक रंगवलेले आढळून आले असेल. त्यासाठी किती खर्च आला असेल, असे तुम्हाला वाटते. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये, जेव्हा पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होते, तेव्हा अल्ट्राटेकने त्यावर किमान ३० कोटी रुपये खर्च केले असतील आणि तेसुद्धा केवळ लोकांनी त्यांचा ब्रॅण्ड पाहावा म्हणून. त्याशिवाय त्यामागे काहीही उद्देश नव्हता. ज्यांनी यापूर्वी क्रिकेट पाहिलेले आहे, त्यांच्या हे लक्षात येईल की, जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळले गेले, तेव्हा साइट स्क्रीन अंबुजा सिमेंट म्हणून वापरला जायचा, ज्याचा खर्चदेखील प्रचंड झालेला असेल.''
माझ्या प्रतिस्पध्र्यानी जसा आणि जेवढा खर्च केला, तसा आणि तेवढा खर्च अजिबात न करता आपल्या बॅ्रण्डची सुधारणा करण्याची अत्यंत अभिनव पद्धत आता आपण ठरवली आहे. वस्तुत: ही कल्पना मला सुचली ती मूळ माझीच कल्पना आहे, असा माझा दावा नाही. कारण ती कल्पना मूलत: एका योजनेचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या मेक्सिकोमधील सीमॅक्सची आहे, ज्या योजनेचा उद्देश त्या बॅ्रण्डच्या उभारणीमागे असलेल्या लोकांना चालना देणे हा होता. त्यांनी अधिकाधिक अजिंक्यपदे मिळवलेला फुटबॉल क्लब खरेदी केला. साहजिकच त्याचा परिणाम सीमॅक्स बॅ्रण्ड व बॅ्रण्डची प्रतिमा यामध्ये सुधारणा होण्यात झाला आणि बाजारपेठेतील मूल्य असाधारणरीत्या वधारले. खरे तर हे एक अभ्यासपूर्ण उदाहरण आहे. तर या गोष्टी आपल्या ग्राहकांच्या मनात ठसतात. जेव्हा इंडियन प्रीमिअर लीगची घोषणा करण्यात आली, तेव्हा आम्ही बोली लावली. त्यामुळे काय होईल तर ब्रॅण्ड विभाग नावाचा एक नवा विभाग मार्केटिंग विभागांतर्गत काम करेल. तो बॅ्रण्डच्या प्रचार व प्रसाराकडे लक्ष देईल. यावर खर्च करण्यासाठी फार वेळ खर्ची घालायला हवा अशातलाही भाग नाही. अगदी आजदेखील लीगमधील १२ क्लबच्या संघांचे व्यवस्थापन इंडिया सिमेंट १० किंवा १५ वर्षांसाठी करीत आहेच. आम्ही हे गेली ३० वष्रे करीत आहोत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी स्वतंत्र 
असा कोणताही वेळ खर्ची घालण्याची गरज नाही.
क्रिकेट हा आपल्या देशाचा धर्म आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. बॅ्रण्ड व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केल्यास आम्ही त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आमच्या स्टॉकिस्ट-रिटेल नेटवर्कची किंवा वितरणाची यंत्रणा उभारू. आपण एकत्र होऊ आणि आपला बॅ्रण्ड अधिक सर्वोत्तम करण्याचा मुख्य उद्देश नजरेसमोर ठेवून आपण आपल्या यंत्रणेमध्ये हे सामावून घेऊ. त्याकडे गुंतवणुकीचा भाग म्हणून पाहा. आपण आत्तापर्यंत उभारलेल्या पशांमधून यासाठी ९० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत, असे काही गरसमज आहेत, पण तो मूर्खपणा आहे. आपण आपल्याशी बांधील आहोत, हेच एक सत्य आहे. फ्रँचायझीसाठी पुढील १० वर्षांसाठी दर वर्षी ९ दशलक्ष डॉलर्स देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? दूरदर्शनचे हक्कजे अब्जावधी डॉलर्सना विकले गेलेले आहेत, आणि खर्च आठ फ्रँचायझींच्या मालकांमध्ये विभागला आहे. म्हणजे आपल्याला जे मिळायचे आहे, त्यातून बीसीसीआयचे काही खर्च वजा झाल्यास, ते ९% ते १०% एवढे मिळणारच आहे. त्यामुळे ते १ अब्जांना विकले गेले तर आपल्याला सरळ सरळ ९% ते १०% मिळणारच आहेत. म्हणजे मी ९८ दशलक्ष गुंतवतो आणि मला ९० दशलक्षांहून अधिक मिळतात. त्यामुळे माझ्या खिशातून एक रुपयाही जात नाही. आता मला आणखी काय हवे? मला उत्पन्न मिळतेच. महसुलाचे दोन प्रकार आहेत. एक केंद्रीय संघ महसूल जो आयपीएल जमा करेल आणि आठ फ्रँचायझींमध्ये वितरित करेल, जो शीर्षक प्रायोजकत्वासाठी देण्यात आलेली रक्कम असेल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा परदेशी संघ भारताला भेट देण्यासाठी येतात, तेव्हा ते प्रायोजक निश्चित करतात. गेल्या वेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ आला तेव्हा प्रत्येक सामन्यासाठी ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत खर्च आला. ५६ सामने खेळले जातील. म्हणजे प्रत्येक सामन्यासाठी विकले गेलेले शीर्षक प्रायोजकत्व घेतले जाईल आणि बीसीसीआयने त्यांची छोटीशी टक्केवारी बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक रक्कम आठ खेळाडूंना वितरित केली जाईल. त्यानंतर त्या अधिकृत भागीदारी प्रायोजकत्वाव्यतिरिक्त जी केंद्रीय पातळीवर पंच प्रायोजकत्व व नाईकेसारख्या गणवेश पुरवठा प्रायोजकांकडून किंवा त्यांचा पुरवठा जे करतील त्यांच्याकडून जी रक्कम असेल, ती जमा होईल आणि पुन्हा वितरित करण्यात येईल. स्थानिक महसूल संपूर्णपणे फ्रँचायझींच्या मालकीचा असतो, म्हणजे त्यांना महसूल फ्रँचायझी मिळते. तुम्ही भारतीय संघाकडे पाहिलेत, तर खेळाडूच्या शर्टावर तुम्हाला सहारा दिसेल. सहारा भारतीय संघाला वर्षांकाठी सुमारे १३० ते १५० कोटी देते. त्यानंतर दर्शनी बाहय़ांवर नाईकेचा लोगो आहे, ते भारतीय संघाला सुमारे १०० कोटी देतात. म्हणजे प्रत्येक क्लबचा संघ त्यांचे शर्ट विकू शकतो, त्यांच्या दर्शनी बाहय़ा व शर्टाची मागील बाजू इ. विकू शकतो, मदानावरील व्यापारी सौजन्य, प्रवेश जमा आणि ज्या वेळी सामना असेल त्या वेळी स्थानिक प्रचार व प्रसाराद्वारे जमा झालेली सर्व रक्कम ही संघाकडेच जाते. आता ९ दशलक्षांच्या बॅ्रण्डच्या बाबतीत. मला ९ दशलक्ष परत मिळतात. दूरदर्शन महसुलाद्वारे मला ९ दशलक्षांहून अधिक मिळतात. हा एकूण महसूल मिळून संघ चालवण्याच्या खर्चापेक्षाही अधिक असेल. माझ्या खिशातून एक रुपयादेखील जाणार नाही. पण माझ्यासाठी आणखी जमेच्या बाजू कोणत्या आहेत? माझ्यासाठी इतर जमेच्या बाजू म्हणजे, माझे स्वारस्य मुख्यत्वे करून माझ्या बॅ्रण्डच्या प्रसिद्धीमध्ये आहे. माझ्या ब्रॅण्डचा प्रसार अगदी मोफत होईल, त्याशिवाय काही उत्पन्नही मिळेल. जे आपल्यासाठी फार अर्थपूर्ण आहे, नेमके तेच लोकांना समजलेले नाही. इतर कंपन्यांसाठी ते वेगळे असेलही. माझ्यासाठी, माझा बॅ्रण्ड हा भारतात क्रेझ असलेल्या क्रिकेटच्या बरोबरीने आहे. यामुळे आपल्याला एक उत्तम संधी मिळाली, ज्यामुळे आपल्याला खूप काही करण्यास वाव मिळाला. त्याशिवाय, इतर देशांच्या लीगकडे, विशेषत: फुटबॉल लीगकडे तुम्ही नजर टाकलीत, तर मालमत्तेचे मूल्य कशा प्रकारे वाढत आहे, हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे मालमत्तेचे मूल्यदेखील वाढते, त्यामुळे कोणताही त्रास न घेता या संघांचे मूल्य तीन ते चार वर्षांमध्ये ३०० किंवा ४०० दशलक्ष डॉलर्सच्या वर नक्कीच जाईल. आता या वेळी, आयपीएलच्या नियमानुसार पहिल्या तीन वर्षांमध्ये आपण संघ बाहेर काढून घेऊ शकत नाही. त्यानंतर तो संघ अन्य कंपनीकडे सोपवण्याचे आमच्या मनात आहे, आम्ही पहिला धारण कालावधी पार केल्यानंतर, आम्ही जनतेमध्ये जाऊ, आयपीओला मूल्य जाणवून देऊ. वस्तुत: प्रवर्तक म्हणून, क्रिकेटचा चाहता म्हणून आणि बीसीसीआयचा एक भाग म्हणून हा सर्व काळ क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची मला उत्तम संधी मिळाली. इतरांप्रमाणे स्वतंत्र कंपनीमध्ये सामावून घेणे हे फारच सोपे आहे आणि ते केवळ मी केले आहे. ती केवळ कल्पना नव्हती, ती केवळ आíथक बाब नव्हती. तो इंडिया सिमेंटच्या ब्रॅण्डची प्रतिमा सुधारण्याचा एक भाग आहे आणि अखेरीस तीन वर्षांनंतर जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होऊ, तेव्हा तो भरपूर पसा मिळवून देईल.''
response.lokprabha@expressindia.com 

No comments:

Post a Comment